मनोगतींनो ...
र.पॅ. वाचताना, आपोआप तोंड पण खाण्याच्या स्टाईल मध्ये हलत होते. अणि अनुताईंचा माहिती स्त्रोत बघुन, नुसत्या निरीक्षणाने सुध्दा पाककलेची सिध्दी मिळवता येऊ शकते हे लक्षात आले. (आता शनिवार, रविवार एखादी भेळेची गाडी पकडायला हवी).
काही सुचना कराव्याश्या वाटल्या अर्थात या सुध्दा निरिक्षणानेच आत्मसात केल्या आहेत. (अनुताईंना नम्र अभिवादन करून) ... काय करणार जिभेचे चोचले पुरवावे लागतात ना ..........
चिंचेची चटणी ... या चटणी मध्ये खजूर (बीया काढलेले) वाटून टाकल्यास चांगली चव लागते. चिंचेचा अंबटपणा आणि खजुराचा गोडवा वेगळीच लज्जत निर्माण करतो. हिच चटणी (गोडपाणी) आपण भेळ, शेवपुरी इ. प्रकरांकरता वापरु शकता. सुरवातीलाच कमी पाण्यात वाटलेली चटणी शितकपाटात बरेच दिवस राहू शकते. (म्हणजे आज शेपुबद, उद्या भेपू, परवा पापू असे चटपटीत पदार्थ एकाच आठवड्यात शक्य होतील :)) हिच चटणी गरजेप्रमाणे पाणी घालून पातळ करून वापरता येते.
मिरचीची चटणी ... या चटणी मध्ये पुदीना घातला तर मिरचीच्या तिखटपणाला पुदीन्याच्या वासाची जोड मिळते. याच चटणी मध्ये लसूण घातल्यास चटणीची लज्जत वाढेल. खजुराच्या चटणी प्रमाणे ही चटणी देखील घट्ट रुपात ठेवता येते.
पॅटीस ... लगद्याची ५-६ सेमी व्यासाची चप्पट पॅटीस करून त्यावर हलकेच पावचा चुरा लवावा. पावची चकती (Slice) वाळून कडक झाल्यावर हाताने अथवा वाटणयंत्रातुन (Mixer) चुरून घ्यावी. या पावाच्या चूर्यामुळे पॅटीस कुरकुरीत लागतो. असे पॅटीस चहा बरोबर नुसते सुध्दा छान लागतात.
चू.भू.द्या.घ्या.
आनंद भातखंडे ...