१. जेवढी ऊर्जा जास्त हवी तेवढी जागा जास्त हवी. मुंबई पुण्यासारख्या शहरात ही एक मोठी अडचण आहे.

२. उंच इमारती जवळ असतील तर त्यांच्या सावलीमुळे सौर सेलवर ऊन पडण्याचे प्रमाण कमी होते. (मोठ्या शहरात येणारी अडचण).

३. उपकरणे चालवायची असतील तर सौर ऊर्जेची वीज बनवावी लागेल आणि ती साठवावी लागेल. नाहीतर केवळ ऊन असतानाच वापरता येईल. साठवण करायला बॅटरी लागते. तिची देखभाल करावी लागते. ती चिरंतन काळ टिकत नाही.

एकंदर प्रकार खर्चिक व कटकटीचा आहे. कमी शक्तीची उपकरणे चालवायला सौर ऊर्जा वापरता येईल पण वॉशिंग मशीन, फ्रीज, व्हॅक्युम वगैरे चालवायला खूप जास्त ऊर्जा लागते तितकी बनवू शकणारी यंत्रणा फार महाग पडेल.