हे विडंबन चांगले आहे पण काही बदल सुचवावेसे वाटतात.

धान्यासमान दळतो जात्यात माणसांना
पीठासमान भरतो पोत्यात माणसांना

>>शेरात सहजता आहे. पण धान्य पोत्यात असते, पीठ पोत्यात नेहमी साठवत नाहीत. त्यामुळे ओळी खटकतात. चू.भु.द्या. घ्या

आता कधी , कुठेही पीण्यास सिद्ध झालो
घेऊन हिंडतो मी पेल्यात माणसांना
>> ऱ्हस्व दीर्घाची ओढाताण करू नका. 
आता पितो अवेळी ,काही जरी असो ते
घेऊन हिंडतो मी पेल्यात माणसांना
असा काहीसा बदल पहा.

कार्यालयी दिवाळी, खाऊ फराळ वजनी
चरण्यास खूप असते खात्यात माणसांना
>>छान, हा शेर आवडला.

मुसळांमध्येच होते गणना तुझी अताशा
खुपतोस खोडसाळा डोळ्यांत माणसांना
>> हा हा, छान मक्ता आवडला.