विकी महाशय,
एकाच चर्चेत आपण अनेक विषय घेतल्याने काहीसा गोंधळ होत आहे. मला दिसलेले तीन स्वतंत्र चर्चा होतील असे विषय:
गिरणी संप
मुंबईची अधोगती
मराठी माणसाची घटणारी संख्या.
अर्थात तिन्हीचा संबंध तितकासा घनिष्ट नाही.
या आधी गिरणी संपाविषयी मी लिहिलेच आहे. मात्र गिरणी संपामुळे मराठी माणसाची संख्या घटली वा मुंबईची अधोगती झाली हे बरोबर नाही. या गोष्टींचा समिकरणात्मक संबंध प्रस्थापित करता येत नाही.