तात्या आणि स्वाती, प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद. शीर्षक आवडले हे वाचून आनंद झाला. शीर्षक असे देण्यामागे प्रेरणा आणि कल्पना दोन्ही विश्वमोहिनी यांच्या लेखांच्या शीर्षकांमधून मिळाली, त्यामुळे याचे सर्व श्रेय हे त्यांनाच जाते.
स्वाती, विणकाम करणे अजिबात अवघड नाही.. आवड निर्माण होऊन सुरूवात करण्याचीच काय ती जरूर असते. प्रतिभा काळे यांनी लिहिलेली क्रोशाच्या विणकामावरची पुस्तके घेऊन प्रयत्न केल्यास जरूर ती सर्व माहिती खूपच सहजी मिळेल असे वाटते.