संगणकाच्या अंगात आल्यामुळे दोन दिवस मनोगतावर येऊ शकले नाही. आज उत्सुकतेने मनोगत उघडले. तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांनी मन भरून आले.लेख प्रकाशित करताना अनुभवकथनाचा ओवरडोस होईल की काय अशी शंका वाटली होती. पण काय करू? वयाच्या साडेअठराव्या वर्षी बँकेत नोकरी धरली आणि चौतीस वर्षे त्याच बँकेत नोकरी केली. त्यामुळे माझ्या बऱ्याच आठवणी  (माझ्या सुदैवाने भल्या अधिक आणि बुऱ्या फारच थोड्या) बँकेशी निगडित आहेत. तेंव्हा घुमून फिरून माझी गाडी बँकेपाशीच येते. तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनाकरता मन:पूर्वक आभार.
                                               वैशाली सामंत.