हे युग माहितीचे आहे. नव्या माहितीच्या वाटा कायमच इंग्रजीतून जातात असे काहिसे चित्र भारतात तरी आहे. तेव्हा नवी माहिती मराठीतून प्रथम प्रसारित होईल तो सुदिन. तोपर्यंत मराठीला माहितीच्या हाताळणीस, नव्या शास्त्रांच्या संहितास्थापनेसाठी, आणि लोकांपर्यंत प्रभावीपणे प्रसृत करण्याच्या क्षमतेस साजेशी करण्याचे आपले ध्येय असायला हवे. त्यादृष्टीने ह्या तीनही लेखांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
त्सुनामीसारख्या विषयावरील अद्ययावत् माहितीचे भंडार मराठी वाचकांपर्यंत सहज पोहोचविण्याचे काम ह्या मालिकेने साधलेले आहे.
त्याखातर, वरदाजी आपले हार्दिक अभिनंदन.
हा प्रयास मालिकेसरशी न संपता, संबंधित शास्त्रावर मराठीत पुस्तक काढायचे आहे, पुढे जाऊन ते पुस्तक पाठ्यक्रमाचा आधार होणार आहे अशा दृढ संकल्पाने संहितासाधन सुरूच राहो हीच प्रार्थना!