मुंबईत एकुण मराठी माणसाचे प्रमाण संपा आधी किती होते व संपानंतर किती झाले ते सांगाल?
संप झाला व गिरण्या बंद पडल्या तेव्हा किती टक्के गिरणी कामगार मराठी होते व किती टक्के अमराठी ते सांगाल?
गिरणी संपामुळे मुंबईची अधोगती झाली म्हणजे नेमके काय झाले ते सांगाल?
मुंबईच्या एकुण मराठी लोकसंख्येच्या किती टक्के लोक गिरणी कामगार होते ते सांगाल?
प्रत्येक क्षेत्रात अमराठी प्रमाण वाढत आहे त्याचा गिरणी संपाशी संबंध कसा लावाल?
मराठी माणसे कमी झाली की मराठी माणसाचे प्रमाण घटले? ते घटण्याचे कारण परप्रांतियांची वाढती संख्या. परप्रांतिय सोडा, नुसते बांगला देशी घुसखोर मुंबईत दोन लाख आहेत!
खाणावळीत गर्दी वाढली की आमटी पातळ होत जाते. आमटी कमी होत नसते, तर तिच्या प्रमाणात पाणी वाढत असते:).