क्रोशाचे काम कळले नाही

मृदुला, मी जे विणकाम सांगितले ते अगदीच मुलभूत विणकाम आहे क्रोशामधलं. खरं तर साखळ्या आणि खांब याव्यतिरिक्त काहीच नाही क्रोशामध्ये. तेवढं शिकून घेतलंत तर एका आगळ्यावेगळ्या विश्वाचं दार उघडल्यासारखंच होईल तुम्हाला. या प्रकारच्या लेखनावर इथे कसे, किती प्रतिसाद येतात त्यावर ठरवणार होते मी अशाप्रकारचं लेखन इथे करायचं की नाही ते. हे सगळे प्रकार मी माझ्या डायरीत चिक्कार लिहिलेत पण मनोगतवर लिहून सगळ्यांना सांगावेत असं मनात आलं म्हणून एक प्रयत्न करून पाहिला. एकूणच अवघड दिसत आहे इथे सगळंच. :-( असो.

गाठी कुठे मारायच्या तेही कळले नाही. :-(

फोटो किंवा चित्राच्या मदतीने समजवायला हवं होतं, हे लक्षात आलं. आत्तातर माझ्याकडे रुमालाचे छायाचित्र उपलब्ध नाही. एक चित्र काढले आहे त्या आधारे समजवायचा प्रयत्न करून बघते.

क्रोशाच्या सहाय्याने रुमाल विणल्यावर वरीलप्रमाणे जाळी तयार होईल. जाळीतल्या प्रत्येक चौकोनाच्या प्रत्येक बाजूला कापडाच्या तुकड्याची अथवा लोकरीच्या तुकड्यांची गाठ मारायची. असे केल्याने पूर्ण रिकामी जागा भरून जाईल व भरीव रुमाल तयार होईल. पुढच्यावेळेस ( चान्स मिळेलसे वाटत नाही पण तरीही.. ) विणलेल्या कलाकृतीच्या छायाचित्रासकट माहिती देण्याचा प्रयत्न करेन. माहिती देण्यातली कमतरता लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, मृदुला.