१. जेवढी ऊर्जा जास्त हवी तेवढी जागा जास्त हवी. मुंबई पुण्यासारख्या शहरात ही एक मोठी अडचण आहे. २. उंच इमारती जवळ असतील तर त्यांच्या सावलीमुळे सौर सेलवर ऊन पडण्याचे प्रमाण कमी होते. (मोठ्या शहरात येणारी अडचण).

इमारतींच्या छतावर आणि भिंतींवर सोलर पॅनल्स बसवता येतील. तुम्ही महिन्याला ५०० KWH वीज वापरत असाल आणि १०० KWH सौरऊर्जा बनली तर तेवढीच बचत.

३. उपकरणे चालवायची असतील तर सौर ऊर्जेची वीज बनवावी लागेल आणि ती साठवावी लागेल. नाहीतर केवळ ऊन असतानाच वापरता येईल. साठवण करायला बॅटरी लागते. तिची देखभाल करावी लागते. ती चिरंतन काळ टिकत नाही.

हल्ली मी भारतात बऱ्याच लोकांकडे इन्व्हर्टर बघितले. त्यातच ही वीज पुरवायची. सौरऊर्जेबरोबरच वाऱ्याची ऊर्जा, किनाऱ्यांवर भरती ओहटीची ऊर्जा, इ. पर्यायी ऊर्जा आणि आपली नेहमीची वीज या इन्व्हर्टर मध्ये पुरवायची आणि लागेल तशी वापरायची.