रंगवून टाकणारे गाणे ! नाच केलेला अजिबात न आवडणाऱ्या माझ्या आऊला या गाण्यावर मात्र मी नाच केलेला आवडायचा ! रागवणी पडणे तर दूरच उलट कौतुकमिश्रित थाप पाठीवर पडून खोबऱ्याची गोळी खायलादेखील मिळायची. दोघींची आवड साधली जायला हातभार लावणारं हे गाणं हळूहळू कधी मला भन्नाट आवडणाऱ्या गाण्यातलं एक होऊन बसलं माझं मलाच कळलं नाही. पुल, गदिमा आणि माणिक वर्मा ही दिग्गज त्रयी या गोड गाण्यामागची खरी सूत्रधार आहेत हे लक्षातच आलं नव्हतं.. तितकं बघायला जायला भानच उरतं कुठे हे गाणं सुरू झाल्यावर. डोळे मिटतात आणि तनमन डोलायला लागते ! अप्रतिम आहे या गाण्याचं सगळंच. खरोख्खर शब्द किती थिटे भासत आहेत भावना व्यक्त करायला...
कौऽसल्येचा राऽम बाई कौसल्येचा राऽऽम !