अमेरिकेत बऱ्याच राज्यात नेट मिटरिंग करू देतात. समजा तुम्ही घरी वीज निर्मिती करता आहात... तुमची सौरऊर्जा दिवसा तयार होणार पण तुम्हाला वीज लागणार रात्री. इथे तुम्ही दिवसा वीज ग्रीड मध्ये सोडू शकता आणि तुमचं मिटर उलटं फिरतं. म्हणजे वीज बॅटरीमध्ये साठवण्यापेक्षा तुम्ही दिवसा इतरांना ग्रीड मार्फत वीज पुरवता आणि रात्री परत घेता. तुम्ही जर ग्रीडला दिलेल्या विजेपेक्षा जास्त वीज वापरली तर फरकाचे पैसे द्यावे लागतात, पण जर कमी वापरली तर तुम्हाला पैसे देखिल मिळू शकतात.