मला वाटते "ही यादी १० पुस्तकांनी वाढवली तर तुम्ही कुठली पुस्तकें यात समाविष्ट कराल ?" हा प्रश्न अभ्यसनीय होईल. लगेच सुचतील अशी माझी दहा पुस्तके येणेप्रमाणें : (कुठलाही लेखक/लेखिका एकदांच घ्यावा/घ्यावी ही अट मी पाळत आहे; त्यामुळे मूळ यादीतील नावे घेत नाही.)

पैस : दुर्गा भागवत

सौंदर्यानुभव : रा. भा. पाटणकर

पार्थिवतेचे उदयास्त : द. भि. कुलकर्णी

नाट्यत्रयी (वाडा,मग्न तळ्याकाठी, युगांत) : एलकुंचवार

यक्षांची देणगी : जयंत नारळीकर

एकूण कविता : दिलीप पुरुषोत्तम चित्रे

गोलपीठा : ढसाळ

चंद्रमाधवीचे प्रदेश : ग्रेस

रथचक्र : श्री. ना. पेंडसे

आंधळ्याच्या गायी : मेघना पेठे