चित्पावन शब्दाची व्युत्पत्ती चिते पासून पावन अशी मी ऐकली होती. त्याचे स्पष्टीकरण म्हणजे काही वाटसरू(प्रवासी) समुद्रावरून जहाजातून येताना वादळात सापडून कोकणाच्या किनाऱ्याला लागले. तेथे त्यांना चितेच्या ऊष्णतेने जीवदान मिळाले असा प्रवाद होता.
साधारण ३०-३५ वर्षांपूर्वी इलस्ट्रेटेड वीकली या साप्ताहिकात त्याबद्दल मोठा लेख आला होता.
हा अंक मुंबईच्या टाईम्सच्या कार्यालयात मिळू शकेल असे वाटते.
सर्किटमहाशयांकडे याची माहिती काढण्याची आणखी साधने असतील.
हा प्रतिसाद विषयाला सोडून आहे असे वाटल्यास क्षमस्व.
कलोअ,
सुभाष