अगदी गच्चीत सौर पॅनेल बसवले तरी बाजूला उत्तुंग इमारती असतील आणि आपली इमारत काही मजल्यांनी छोटी असेल तर ऊन अडणारच. इतकी खर्चिक गुंतवणुक करुनही पुरेशी ऊर्जा मिळत नसेल तर फार लोक उत्साही रहाणार नाहीत. पुन्हा एका अपार्टमेंटच्या इमारतीत किती बिऱ्हाडे आहेत आणि गच्चीत असणारी जागा हे प्रमाणही अत्यंत व्यस्त आहे त्यामुळे कुणी किती जागा वापरायची ह्यावर वादंग होऊ शकेल. एखादाच वापरणारा असेल तर ठीक आहे.
इन्व्हर्टर: ह्या उपकरणात एक तरी बॅटरी असतेच. वीज पुरवठा चालू असताना तो रेक्टिफाय करुन त्यावर बॅटरी चार्ज केली जाते. वीज गेल्यावर इन्व्हर्टर वापरुन त्या बॅटरीचे व्होल्टेज एसी करून घरातील उपकरणांना पुरवले जाते. सौर उर्जेकरता हे वापरायचे असेल तर ह्यात बरेच विद्युतमंडलीय उपद्व्याप करुन बदल करावे लागतील (थोडक्यात नवे सर्किट घालावे लागेल). तेव्हा हे प्रक्ररणही इतके सोपे नाही.
उपलब्ध वीज आवाक्याबाहेर महाग झाली वा आठवड्यतून एखाद दोन दिवस इतकी दुर्मिळ झाली तरच सौर उर्जेवर वीज बनवणे परवडेल असे वाटते.