विकी महाशय,
माहित नसेल तर तसे सांगा. सगळ्यांना सगळे माहित असतेच असे नाही. मात्र एखादे विधान करताना काही मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.
आता एका सोप्या प्रश्नाचे उत्तर द्या. डान्स बार वर बंदी येताच त्या मुलींचे पुनर्वसन करायला आसुसलेले नेते गिरणी कामगार बेकारीच्या खाईत गेला तेव्हा कुठे होते?
मुंबईच्या अधोगतीचे म्हणाल तर आपण चुकत आहात. आज २० हून अधिक पंचतारांकीत हॉटेलच्या हजरो खोल्या अपुऱ्या पडत असून असंख्य बहुराष्ट्रिय हॉटेल समुह मुंबईकडे झेपावत आहेत. मुंबई विमानतळाला धावपट्ट्या अपुऱ्या पडत आहेत. शहराला वीज, पाणी व रस्ते अपुरे पडत आहेत. रोज तिनशे मोटारी नव्याने रस्त्यावर येत आहेत.
दुर्दैवी गिरणी कामगाराला मराठी अमराठी या वादात घुसडू नका. एकेकाळी बेस्ट चे वाहक - चालक १००% मराठी होते. आज ती सेवा सुरू आहे तरीही अमराठी माणसे सेवेत वाढत आहेत. हीच गत बँक, विमा, शिक्षण, महापालिका सेवा, पोलीस सेवा या सर्वच्या सर्व क्षेत्रात आहे.
गुजराथी लोकांचे प्राबल्य गेली ४-५ दशके आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर नाव गुजराथी भाषेतही लिहिलेले आहे आणि ते गेली किमान ४ दशके आहे. शेट्टींची हॉटेल संस्कृती हा मुंबईच्या जीवनाचा अविभाज्य घटक गेली चार दशके तरी आहे. किंबहुना असंख्य पंजाबी ढाबे/ हॉटेल्सच्या जागी आता शेट्टींचे बार आहेत.
नविन आहे ते गेल्या दोन दशकातील उत्तरेकडचे आक्रमण.
तात्पर्य: परप्रांतिय वाढत आहेत, मराठी कमी होत आहेत. त्याचा गिरण्यांशी संबंध नाही. तसाच गिरण्यांचा संबंध मुंबईच्या अधोगतीशीही नाही.