आज आपल्याला ४-५०० वर्षांनी महाराजांचा हेतू व आवाका सहज कळून येतो पण त्यावेळी ते समजणे सामान्य माणसांना कठीणच होते.
१००% सहमत ! तुमचं म्हणणं पटतंय.
मात्र ही जी घोषणा आहे त्याला विशेषण म्हणू हवं तर. ही महाराजांना आधिकारीक कधीच जोडल्या गेली नाही. मी वर उल्लेख केल्या प्रमाणे, एका पत्रात तो उल्लेख आहे. असो.
माझं मत बदलू शकत नाही हा मात्र गैरसमज आहे. मी अद्याप विद्यार्थी दशेत आहे, शिकतो आहे , याचं मला भान आहे. हा लिहिण्यात जरा आक्रमक( आगाऊ?) असेनही, पण माझ्या मुद्द्यासाठी ते आवश्यक आहे असं वाटतं.
अभयसर एक सांगू ! येथे विद्रोही साहित्याची बाजू मांडायची म्हणून तसं लिखाण झालं. मात्र मी विद्रोही साहित्यातील दोष सुद्धा पुरेपूर जाणतो. मी केवळ एकेरी विचार करतो असं नाही. अहो माझ्या धर्माचा अभिमान आहेच मात्र त्यात बदल झालेले मला हवे आहेत, ही माझी भूमिका पुरेशी स्पष्ट आहे असं वाटतं.
नीलकांत.