म्हणजे पास नक्कीच.

यादी अपूर्ण वाटते. पण २० ची मर्यादा म्हणजे ते आलंच ओघाने.

तुटपुंजे का होईना... तुटपुंजे गृहित धरायचे असेल तर मग हो करते प्रतिनिधित्व. नशीबाने त्यात बकवास वपु नाहियेत.

खरेदी.. घरात आहेत ती (बरीचशी आहेत) आणि ययाती सोडून सर्व. 

खर्च किंवा किमतीबद्दलचा वरील उल्लेख सगळं काही फुकटच मिळालं पाहीजे अश्या मनोवृत्तीचा आहे. मराठी लेखक आणि संपादक दोन्हीही आज इमले माड्या बांधत नाहीयेत. मराठी लेखनावर पोट भरता येणे मराठी लेखकाला शक्य आहेच असे नाही. जोवर माणूस पूर्ण वेळ एखाद्या कामात उतरत नाही तोवर सफाई आणि अस्सल काही येणं मुश्कील आहे.

३० रूपये च्या बदल्यात अंकातून जे मिळतंय ते फार मोठं आहे आणि माझ्यामते तर ३० रूपये ही फक्त मटेरीयल कॉस्ट आहे. कागद, छपाई इत्यादींचे भाव तपासलेत तर हे सहजी लक्षात येईल. आज मध्यमवर्ग ३० रूपये सहज खर्च करू शकतो. अर्थात कुणाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मला काही म्हणायचे नाही पण दिवसरात्र इंटरनेट वापरू शकणाऱ्याला ३० रूपये परवडत नाहीत हे मलातरी खोटे वाटते. म्हणूनच सगळं काही फुकट मिळावं अशी मनोवृत्ती आहे असं मी म्हणते.