माझ्या माहितीप्रमाणे हा शब्द खालील प्रकारे आपल्या भाषेत आला आहे.
विजयनगरच्या साम्राज्याच्या पाडावासाठी त्याकाळीन सर्व मुस्लिम शाह्या एकत्र आल्या आणि त्यांनी विजयनगरचे साम्राज्याचा पराभव अनेगुंडी या नगरात / शहरात केला. मात्र या सर्वांना विजय प्राप्त होताच त्यांनी एकमेकांच्या सैन्याची लूटमार करण्यास सुरवात केली. त्यामुळे कोणाचा कोणातही पायपोस राहिला नाही. या सर्व प्रकारामुळे अनेगुंडी -> अनागोंदी हा शब्द आपल्या भाषेत आले असे वाचलेले आठवते.