नमस्कार,
मराठी पुस्तक आवडीने हातात घ्यावं आणि त्याची किंमत पाहून हिरमुसून ते पुन्हा खाली ठेवून( अथवा चाळून) पुढच्या टेबलाकडे जाण्याचे आता नवल वाटत नाही.
तरीही दर वेळेला अक्षरधाराला आमची वारी ठरलेली आहेच. आता तर अक्षरधारा तब्बल एका महिन्यासाठी अत्रे सभागृहात लागलंय. झकास पुस्तके आणि तीही एकाच ठिकाणी म्हटल्यावर तिकडे जाणं हे आवश्यकच आहे असं माझं मत.
मराठी पुस्तकाच्या किंमती फार असतात या मताशी १००% सहमत.
गेल्या पाच वर्षांपासून आमच्या मित्रांच्या गटात वाढदिवसाला सर्वांमिळून एक पुस्तक देण्याचा उपक्रम राबवतो आहोत. यातूनच महानायक, स्वामी, संभाजी , पानिपत आदी पुस्तके संग्रही आहेत. मित्रांत ती फिरत असतात.
पुस्तके घेण्याचे माझे निकष
१) पुस्तक मला आवडले पाहिजे
२) मी ते एक पेक्षा जास्त वेळ वाचू शकलो पाहिजे
३) किंमत खिशाला परवडणारी हवी. (हे फार महत्त्वाचं)
नीलकांत