गिरणि संप झाला आणि एक एक करून मुंबईतुन मराठी माणुस कमी झाला. जेव्हा गिरण्या चालू होत्या तेव्हा मुंबईत मराठी माणसाची  संख्या सर्वात जास्त होती. संप झाला आणि हळुहळु एक एक करून गिरण्या बंद होत गेल्या. कामगार देशोधडीला लागला. आशेवर बसला आज चालु होईल उद्या चालु होईल नाय चालु होत तर पैसे तरी भेटतील या आशेवर बसला तो बसलाच त्याबरोबर संपलापण.कित्येकांनी आत्महत्या केल्या. मुंबईतला कापड उधोग संपला.तरी प्रश्न पडतो  संपाला जबाबदार कोण पण हा वेगळा विषय होऊ शकतो.

गिरण्यांत काम करणारा कामगार हा महाराष्ट्राच्या विविध प्रदेशातुन आला होता. गिरण्या बंद झाल्या आणि काही तिथेच राहीले,काहीउपनगरात , गावी, विरार,कल्याण येथे स्थिरावले.पण मुंबईतुन संपले.

लिहावस खुप वाटत पण एकुणच काय गिरण्या संपल्या आहेत त्याजागी टोलेजंग टॉवर आले आहेत .तेथे राहणारे कोण आहेत . चाळ संस्कृती लोप पावतेय तेथे ही टॉवर संस्कृती आलीय .गिरणि कामगार केव्हाच संपलाय उरल्यात त्याच्या आठवणि.

एकुणच गिरण्या व त्याच्या कामगारांच्या व्यथा व वेदना फार मोठ्या आहेत .त्या लिहीता येत नाहीत.सांगताही  येत नाहीत.

त्या गिरणि कामगारांस (लाल )सलाम.