येथे फक्त पुस्तक असे गृहित धरले आहे. मराठी पुस्तक असे नाही.

पुस्तक विकत घेताना अजून कोणत्या निकषावर पुस्तकाची खरेदी होत असते, उदाहरणार्थ, संग्रही असावे असे खरोखरच वाटते काय?

ते त्याच्या विषयावर अवलंबून आहे. विशेषतः भेट म्हणून पुस्तक देण्याची सवय आहे. बरेचदा,संग्रही असावे असे वाटते परंतु घरात सध्या ते कोठे ठेवायचे अशीही काळजी वाटते.

पुस्तकांचे आदानप्रदान व्हावे काय?

मला पुस्तके इतरांना द्यायला आवडत नाहीत. पुस्तके दुमडणाऱ्या, पानांवर खुणा करणाऱ्या, ती इतस्ततः टाकणारी आणि वेळेत परत न करणारी माणसे आवडत नाहीत. या गोष्टी मला लागू होत नसल्याने इतरांकडून पुस्तके मिळवणे मला आवडते. ;-) (याला कोणीही खुशाल स्वार्थ म्हणावे.)

भेटीसाठी आपण पुस्तकांचा विचार करतो काय?

नेहमीच; यापेक्षा अधिक उत्तम भेट दुसरी नाही असे मला वाटते.

जवळच्या ग्रंथालयात पुस्तक मिळते काय?

जवळचे ग्रंथालय एखाद्या मॉलला लाजवेल इतके मोठे आहे. तेव्हा हवे ते पुस्तक हमखास मिळते. अर्थात इंग्रजी.