पूर्वी किंमत पाहून पुस्तके खाली ठेवावी लागत असत. छोट्या वाचनालयांवर तहान भागवावी लागे. आता मला नोकरी लागल्यापासून पुस्तकांच्या किमती जास्त वाटत नाहीत. त्यामुळे आपोआप संग्रह वाढतो आहे. खरेदीचा निकष (तेव्हा आणि आताही) - वाचलेली परीक्षणे, ओळखीच्या पुस्तकप्रेमींच्या शिफारशी, मलपृष्ठावरील माहिती व पुस्तक चाळून बनलेले मत.
आत्ता पर्यंत पुस्तकांची विल्हेवाट लावण्याची वेळ आलेली नाही. पण आल्यास जवळच्या वाचनालयाला किंवा मित्रमंडळींना वाटून टाकणे हा सोपा उपाय दिसतो आहे.