विकि, सर्वसाक्षींनी वर मुद्देसूद माहिती दिली आहे. त्यामानाने तुम्ही नुसतेच प्रश्न विचारता आहात. तुमच्या पुष्कळ टिंबाच्या खालच्या प्रतिसादातदेखील लिहिण्यासारखे खूप आहे पण लिहिता येत नाही असे म्हणता. का लिहिता येत नाही? गिरण्याच्या संपामुळे मुंबईची अधोगती झाली असे तुम्हाला वाटत असेल तर त्याची आकडेवारी द्या. मुंबई शहराची उलाढाल किती होती, किती आहे. इतर शहरांच्या तुलनेत ती कमी वाढली आहे का; मुंबईत मराठी माणसे किती टक्के होती, किती लाख होती आता किती आहेत; मुंबईतून निवडून येणारे किती खासदार, आमदार मराठी होते, आता किती आहेत. ही सगळी माहिती काढून त्याच्या पायावर लिहा. उगाच मोघम विधाने करू नका. माहिती नसेल तर तसे सांगा. माझा असा तर्क आहे असे लिहा. उत्तरे न देता नुसते प्रश्न विचारून, बिनबुडाची विधाने करून तुम्ही तुमचीच विश्वासार्हता गमावत आहात.
----
संपूर्ण जगात बघितले तर वेगाने वाढणाऱ्या शहरात 'बाहेरचे' लोक पुष्कळ दिसतील. मुंबईत येणारे नागपूरचे लोक आणि सूरतचे लोक यात जवळचे कोण? बाहेरचे कोण? मला वाटते मुंबईतले ९९% लोक बाहेरचेच आहेत! मराठी माणसांना जिकडे नोकरी मिळते, ज्या प्रकारचे काम झेपते तिकडे ते जातात. तसेच उत्तरेकडचे, दक्षिणेकडचे आणि जगातले सगळेच! मुंबई महाराष्ट्रात आहे म्हणून तिथे मराठी लोकांसाठी नोकऱ्या राखून ठेवाव्यात ही अपेक्षाच चुकीची आहे. मुंबईत राहायचे असेल तर मराठ्यांनी स्पर्धेत उतरावे, राजकीय दृष्ट्या सजग व्हावे.
इथे इंग्लंडात 'गिरण्या' आणि अनेक कारखाने गेल्या काही वर्षात बंद झाले आहेत. स्थलांतर करून ते इतर देशात गेले आहेत. कारण बाहेर कारखाने काढणे स्वस्त, किफायतशीर पडते. तसेच मुंबईच्या बाबतीत कधी ना कधी घडलेच असते असे वाटते.