या सारख्या विषयावर बोलायचे कुणी आणि कुणाला ? आपल्या या मनोगतावरसुद्धा या आणि त्याच्या अनुषंगीक विषयावर बोलायला कुणी पुढे येत नाही.
मनुवादी म्हणून ब्राम्हणांना मारले (शाब्दीक) जाते. संपूर्ण महाराष्ट्राच्या सरकारी नोकरांमधून आज मराठी ब्राम्हण नाहीसे झाले आहेत. आकडेवारीने बोलायचे झाले तर, १००० सरकारी नोकरांमध्ये १-२ मराठी ब्राम्हण आहेत. तरीही आजही आपली नेते मंडळी ब्राम्हणापासून नोकरशाही मुक्त करायाची चर्चा जोरजोरात करत असतात (मी स्वत: दोनदा या नेते मंडळींना विचारले होते कि ब्राम्हण लोकं आहेत कुठं ? पण ऊत्तरच आलं नाही!). या ब्राम्हणांमधील सर्वात जास्त तिरस्करणीय उपजमात म्हणजे, कोकणस्थ. हा समाजच आता पारश्यांसारखा नष्ट होण्याच्या मार्गाने चालला आहे. त्यांच्या नाहीसे होण्याने, समाजाची थोडीशी का होईना हानी होणार आहे, याची काहीही खंत / जाणीवही दिसत नाही.
या मटाच्या लेखातून अप्रत्यक्षपणे हेच सुचवलेले आहे , असे मला वाटते.!!
दुसरा मुद्दा मांडलेला दिसतो तो म्हणजे, या सर्वांच्या बाहेर येऊन, आपण मराठी म्हणून एकत्र काम करू शकतो का? आणि जर हो , तर काय दर्जाचे काम अपेक्षित आहे, कश्याप्रकारचे काम अपेक्षित आहे आणि त्या साठी काय प्रकारची मानसिक, बौद्धीक तयारी लागेल ? हा विचार सुचवलेला दिसतो.