पुष्कळशी पुस्तके ही तात्कालीक असतात, एकदा वाचून झाली कि परत वाचावीशी वाटत नाही, पण अशी पुस्तके एखाद्या तात्कालीक विषयाशी संबधीत असतात, त्यामुळे ती घेतली जातात. अश्या पुस्तकांसाठी मी दुसऱ्याला वाचायला देणे आणि मिळणार नाहीत अश्याच अपेक्षेने देणे हा प्रयोग करतो.  (बहुधा अश्याच  पुस्तकांची किंमत पुष्कळ असते / वाटते.).माझे  मित्रही माझ्यावर हाच प्रयोग करत असतात.

जी पुस्तके कालातीत असतात (उदा. श्यामची आई, राजा शिवछत्रपती ई. ई. ) अशी पुस्तके मी जपूनच ठेवतो.

वाचनालय हाही एक चांगलाच उपक्रम आहे. पण तात्यांनी सांगितलेली वाचनालयांसारखी परिस्थिती आता सर्वत्र नाही. ज्या जुन्या सार्वजनीक संस्था आहेत तिथेच अशी भरपूर पुस्तके असतात (कारण त्यांना सरकारी मदत असते) आणि नवीन वाचनालयांची निर्मिती तर आता अशक्यच आहे.  

मी वर्णन केलेली परिस्थिती भारतातीलच आहे.

प्रसाद.