मी वर्षापूर्वी जैन सौर बंब बसवला आणि या निर्णयामुळे आम्ही खूष आहोत. खर्च झाला २००००. शिवाय चाळीसगाव ला आमची स्वतंत्र इमारत असल्याने भरपुर उन्ह. त्यामुळे अगदी पावसाळ्यातही गरम पाणी मिळते. अगदीच ढ्ग आणि रिपरिप असेल तर पाणी कोमट मिळते. तेंव्हा अडचण येते. पण असे प्रसंग एक दोनच वेळा येतात.त्यामुळे मी सर्व मनोगतींना आवर्जून सांगेन जागेची अडचण नसल्यास अवश्य सौर बंब बसवा.