विद्यार्थी होतो तेव्हा पुस्तकांच्या दुकानात किमतीसाठी आधी मागचे किंवा आतले पान बघावे लागे. आता सुदैवाने तसे करायची गरज पडत नाही. पण त्या काळातही खूप आवडलेले पुस्तक पैसे साठवून घेतलेले आहे. मला वाटते हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. पुस्तकांशिवाय जगणं अशक्य असे माझ्यासारखे वेडे असतात तेव्हा किंमत हा जरी अडसर असला तरी त्यावर काहीतरी उपाय निघतो.
वाचनालय हा चांगला पर्याय आहे जर तुमचे नशीब चांगले असेल तर. आणि माझे नव्हते. मला पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयातील बाईंनी मराठी पुस्तक द्यायचे नाकारले होते. "हे पुस्तक तुमच्या अभ्यासक्रमात नाही! " अशा लोकांना रौरव नक्की.
खरेदी करताना मी बऱ्याच वेळा २-३ पाने वाचतो. आवडले तर घ्यायचा विचार करतो.याशिवाय मित्रमंडळ शिफारस चालू असतेच.
हॅम्लेट