तरीही आपण देव मानत नाही यावर विश्वास बसला नाही. फारतर देवाचे मूर्त स्वरूप मानत नाही असे म्हणता येईल.
प्रत्येक पशुपक्ष्यांचा धर्म,देव, पंथ, जात काय हे जर मला कळले तर मूर्त/अमूर्त देवावर विश्वास ठेवेन. माणसाच्या म्हणण्या न म्हणण्याने, मानण्या न मानण्याने देवाचे अस्तित्व आहे अथवा नाही हे काही सिद्ध होत नाही. मी देव मानत नाही हे म्हणताना देव ही संकल्पना गृहित धरली आहे. मूर्त-अमूर्ततेचा प्रश्नच उद्भवत नाही.
देवळात जाऊन तिथल्या वातावरणाशी एकरूप होणे यांतही काही विशेष वाटत नाही. ती फक्त mass psychology ची भावना आहे.
अंशत: सहमत आहे. पण दरवेळेस मास सायकॉलॉजी अभिप्रेत नाही. भर दुपारी अथव रात्री देखील एकट्या व्यक्तीला एखाद्या वातावरणाशी एकरूप होता येते मग ते देऊळ असो अथवा मदिरालय, असो.
इतर वेळेस ट्रेनमधल्या कर्णकर्कश्श भजनाला वैतागणारी व्यक्ती जर देवळांत गेल्यावर स्वतः भजन म्हणत असेल तर तो त्या स्थानाचा प्रभाव.
हे त्या व्यक्तिवरही अवलंबून आहे.
विनोदी नाटक सुरू असताना सर्व श्रोते एखाद्या विनोदावर नाट्यगृहात बसून खदखदून हसतात पण तोच विनोद टिव्ही समोर बसून ऐकणारी एकटी व्यक्ती तशीच उपभोगेल असे सांगता येत नाही.
हे मास सायकॉलॉजीच्या संदर्भात वाटते. मूळ लेखाशी या विधानाच संबंध कळला नाही.
तरीही देवळांत होणाऱ्या असंख्य खुळाचारांचा मला हटकून त्रासच होतो.
लेखात मांडायचा मूळ मुद्दा हाच आहे. देवळात जाणे मला ज्या कारणांमुळे आवडते त्याबद्दल लिहिले आहे इतकेच. लेखाला धार्मिकतेची, भक्तीभावाची पुटे चढवण्याची इच्छा झाली नाही आणि गरज तर अजिबात वाटली नाही.
प्रतिसादाबद्द्ल आभार.