मी तुलना करतोय असे म्हणले नव्हते आणि तसा उद्देश नव्हता. चर्चेत खर्चाचा विषय आला होता, त्याला अनुसरून अनूभव दिला.  एक लिहायचे राहीले, ते म्हणजे हा खर्च अमेरिकन असल्याने, नेहेमीप्रमाणेच जास्त आहे (मनुष्यबळ खर्च) आणि या शाळेचे क्षेत्रफळ आणि दिवे बघता, ते बरेच आहे.

सौर उर्जेचा वापर कशासाठी केला जात आहे त्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. पाणि गरम करायला लागणारी उर्जा आणि घरातले दिवे आणि उपकरणे चालवायला लागणारी उर्जा यात फरक आहे. अजून एक खर्चाच्या अनुषंगाने उदाहरण देयचे झाले तर, रस्त्यावरील दिव्यांसाठीचे सौर उर्जेचे दिवे मधे एकदा बघितले होते तर त्यांचा सुरवातीचा खर्च हा सुमारे $३,००० च्या घरात आहे हे कळले. तर घरामागील परसामधे (बॅकयार्ड) टेबलावर ठेवता येतील असे सौरउर्जेचे दिवे हे $१० ला पण मिळू शकतात!