पुस्तकांचे आदानप्रदान व्हावे काय?मला पुस्तके इतरांना द्यायला आवडत नाहीत. पुस्तके दुमडणाऱ्या, पानांवर खुणा करणाऱ्या, ती इतस्ततः टाकणारी आणि वेळेत परत न करणारी माणसे आवडत नाहीत. या गोष्टी मला लागू होत नसल्याने इतरांकडून पुस्तके मिळवणे मला आवडते. ;-) (याला कोणीही खुशाल स्वार्थ म्हणावे.)
स्वार्थ परवडतो!
इतरांना दिलेली पुस्तके ९९*% वेळा परत मिळत नाहीत, असा अनुभव आहे. घेणाऱ्याने ते पुस्तक स्वतःसाठी म्हणून, स्वतःच्या वाचनाच्या आनंदासाठी ढापले असेल, तरी एक वेळ दु:ख नाही, पण बऱ्याचदा घेणाऱ्याने पुस्तक एक तर हरवलेले तरी असते, किंवा आणखी कोणाला तरी परस्पर वाचायला दिलेले असते, आणि मग अशी घेणाऱ्यांची साखळी बनून ते 'कॅनॉट बी ट्रेस्ड'च्या अवस्थेत जाते. महाविद्यालयीन कालात, विशेषतः वसतिगृहांत वगैरे आदानप्रदानाची वृत्ती अधिक असल्यामुळे तेथे हा अनुभव प्रकर्षाने येतो, पण एरवीसुद्धा हे जागतिक सत्य असावे. शहाण्या माणसाने आपले पुस्तक परत पाहण्याची इच्छा असल्यास ते दुसऱ्याला (घरी नेऊन) वाचायला देऊ नये.
- टग्या.
*९९% हा आकडा अंदाजपंचे ठोकलेला आहे. विदातज्ज्ञांनी क्षमा करावी.