अंनिस वाले प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक पातळीवर तपासून पाहतात. त्यांचा श्रद्धेला आक्षेप नाही. कोणी आजारी पडले तर श्रद्धेच्या नावाखाली त्याला अंगारा लावणे, भगताकडून उपचार करून घेणे वगैरे अनेक प्रथांचा त्यांनी स्वतःचे जीव पणाला लावून सामना केला आहे.
नरेंद्र दाभोळकर, श्याम मानव, अनिल अवचट यांच्या अनेक पुस्तकांमध्ये अश्या प्रथा आणि अंनिसचे कार्य याबद्दल विपुल लिखाण आहे.