मराठीला इंग्रजीचा झगा घालून तयार केलेली इंग्रजी जितकी हिडीस वाटते तशीच अतिरेकी अट्टाहासापोटी कृत्रीम  शब्द वापरून केलेली मराठीही. 'मनोगत' वरचे 'टिचकी मारा' आपण सवयीने चालवून घेतले आहे, पण ते आहे तसे कचकड्याचेच. 'कोण कोण आलंय' हे वाचून तर मला आजही हसू येते. कंप्यूटरला 'गणू' म्हणणे ही अशीच विनोदी कल्पना. 'माझ्या गणूच्या मातृफलकाबरोबर मी त्याचा कळपटही बदलला?' हा हा..
बोलीभाषा आणि लेखीभाषा यात फरक रहाणारच. दोन्हीकडे अतिरेकाचा मोह टाळला तरी पुष्कळ झाले.