अंतर्नाद मध्ये प्रसिद्ध झालेली यादी ही वाचकांच्या प्रतिसादावर आधारित आहे. त्यात अंतर्नादचा सहभाग म्हणजे त्या यादीचे संकलन व प्रसिद्धी, इतकाच आहे. त्या निमित्ताने सुजाण मराठी वाचकाला कोणते मराठी साहित्य महत्त्वाचे वाटते हे तपासून बघण्याची संधी मिळते आहे. ही यादी आणि 'मनोगत' वरील प्रतिसाद  यातून एकूणच मराठी साहित्याचा आणि वाचकांच्या आवडीनिवडीचा धांडोळा घेता येतो आहे. या यादीशी सहमत असण्याचा आग्रह कुणालाच नाही, पण या निमित्ताने काही मंथन झाले आणि त्यातून काही हाती लागले, तर ते हवेच आहे.
आपल्याला जे आवडत नाही, जे मत आपल्या थोड्या विरोधात जाते,ते अनाठायी आहे, ते उबवलेले आणि व्यापारी आहे असे का म्हटले जावे, हे कळत नाही.