श्री. मी एक,

मार्च २००५ च्या लेखाला आज अचानक काही प्रतिक्रिया आलेल्या वाचून आश्चर्यच वाटले होते. एवढा जुना लेख वाचून आवर्जून प्रतिक्रिया दिलीत हे पाहून फार समाधान वाटले. धन्यवाद.

धन्यवाद श्री. हॅम्लेट आणि श्री. सचिन म्हेत्रे,

आपल्या प्रतिक्रिया हेच आगामी कलाकृतींचे इंधन आहे. धन्यवाद.

श्री. माऊडी,

'बघ हात दाखवून' चित्रपटात मकरंद अनासपुरेच्या पत्नीचे नाव 'माया' असते तो सारखा तिला 'मायडे' अशी हाक मारतो. ( ते मला आवडले होते) त्याच्या जवळ जाणार (माऊडी) आपला ID आहे. त्यामुळे त्या चित्रपटाची आठवण झाली.

तुम्ही देवनागरीत लिहिता लिहिता मध्येच इंग्रजी अक्षरे कशी लिहिलीत??  

ctrl_t दाबून कुठेही देवनागरी आणि इंग्रजी अक्षरात लिहिता येते. मनोगताच्या उजवीकडील वरील कोपऱ्यात त्या संबंधीच्या सूचना आढळतील.