नमस्कार विलासरावजी. इथे अभिप्राय देऊन, आपली अनुभूती व्यक्त करण्याखातर हार्दिक धन्यवाद.

आपण म्हणता ते खरेच आहे. आत्मज्ञान अत्यंत आवश्यक आहे.

ज्यांना आत्मबोध झाला आहे, असे बुद्ध व समर्थांसारख्या लोककांपुरताच आत्मबोध नाही.  तर सर्वसामान्य लोकांनाही आत्मबोध होण्याची गरज आहे. 'विद्धि मां, विद्धि मां, श्रुणू' (मला जाणून घे, मला जाणून घे, ऐक) म्हणणाऱ्या चराचराला, कलाकलाने जाणून घेत आपण आपले आत्मज्ञान विस्तारले तर आपली आधिभौतिक तसेच आध्यत्मिक उन्नती निश्चितच होऊ शकेल. त्यासाठीच मीही हा प्रयास करीत आहे.