माझा पुस्तकं खरेदीचा निकष आहे की घेतल्यानंतर किती वेळा वाचावंसं वाटतं????

विकत घेतल्यावर परत परत वाचावीशी वाटणारी पुस्तकंच मी विकत घेते!!!त्यासाठी मिळतील त्या ठिकाणाहून ती मिळवून मी ती आधी वाचते व ठरवते की विकत घ्यायची की नाही!!!

अनेक वेळा आत्मचरित्र, कथा, कादंबऱ्या वगैरे एकदाच वाचून त्यातील रस संपतो!! मग ती परत वाचावीशी वाटत नाहीत!! असं झालं तर ती नाही घेत मी!!

पण लहानपणापासून महिन्याचा खर्चाचे पैसे, दिवाळीची ओवाळणी साठवून, आई-वडिलांकडे हट्टाने पैसे मागून पुस्तके खरेदी केली आहेत!! आज  ही त्याच्यावर नजर गेली की सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात!!! आणि त्या पुस्तकांनी दिलेला अनेक वेळा दिलेला आनंद मनात सांडत राहतो!! सगळे हट्ट कारणी लागल्यासारखे वाटतात!!

रोचीन.