विकी महाशय,
इतका गंभीर विषय सोडून रागारागाने जाउ नका. अनेक गिरण्यांचा एकत्रित संप झाल्याने ते दिसून आले व जाणवले. पण ला. ब. शास्त्री मार्ग, वागळे औद्योगिक वसाहत, पश्चिम उपनगरातील द्रुतमार्गा नजिकचे कारखाने, बेलापूर पट्टा आणि भरपूर पगार देणाऱ्या औषध कंपन्या मुंबईतून गेल्या व असंख्य कामगार बेकार झाले ते विसरलात?
कुठे आहे रॅप्टेकॉस ब्रेट, कुठे आहे मे ऍण्ड बेकर? कुठे आहे बरोज? कुठे आहे ग्लॅक्सो? कुठे आहे बूट्स? मॉडेला, प्रिमिअर, नेरोलॅक, डंकन, जर्मन रेमेडिज, ... किती नावे सांगु?
मुंबई हे शहर औद्योगिक शहराकडुन व्यापारी शहराकडे जात आहे आणि व्यापारी, सल्लागार, तज्ज्ञ, व्यावसायिक या स्वरुपाच्या नोकऱ्या इथे निर्माण होणार आहेत, केवळ कष्टकरी व प्रामाणिक कामगार असणे पुरेसे नाही हे लक्षात न येणे वा आले तरी पटकन स्वत:ला न बदलणे हे कदाचित मराठी माणसाला नडले असावे.
मात्र कामगार दहशतवाद व औद्यओगिक दादागिरी यामुळेच मालकवर्ग कारखाने बाहेर हलवायला उद्युक्त झाला व जागा विकणे फायदेशिर असल्याचे त्याला समजले. बाह्यनिर्मितीची मजा चाखल्यावर कामगारांकडुन उत्पादन करून घेण्याची गरज उरली नाही.
विकी साहेब, कामगार संघटना व कामगारनेतेपणा हा व्यवसाय झाला व तो कामगारांच्या नाशाला कारणीभूत झाला हे आपल्याला ठाउक नसावे. जे कामगार कारखाना बंद पडल्यावर लघु उद्योजकाकडे अत्यल्प वेतनावर मर मर राबू लागले तेच कामगार कंपनिच्या उपहारगृहात 'आज ठरल्याप्रमाणे नाश्त्याचा पदार्थ नाही' म्हणून काम बंद करत होते, अनुदानीत पद्धतिमुळे सवलतीच्या दरात मिळणाऱ्या अन्नचा दुरुपयोग करत होते - ५ पैसे दराने मिळणारे बटाटे वडे एककेमाना फेकून मारत होते हे आपल्याला माहित आहे काय? कार्मिक विभागाचे कर्मचारी हे आपले शत्रू नाहीत तर व्यवस्थापनाचे नोकर आहेत व त्यांचे हुकुम बजावत आहेत हे नजरेआड करून कामगार त्याना मारहाण करत होते. काम करा, उत्पादन वाढवा, संपन्न व्हा हे सांगणारा व त्याचबरोबर हक्काने आपल्यासाठी लढणारा नेता कामगाराना नको होता. काम करुन मिळवायचे तर संघटना कशाला? व्यवस्थापानाचा नफा हा आमचा नफा व अमुक एक वाढ व वार्षिक बक्षिस रक्कम दिलीच पाहिजे न पेक्षा बंद पाडु हे सांगणारा नेता लोकप्रिय झाला तेव्हाच ऱ्हासाला आरंभ झाला. रेल्वेचे कारकून संगणकिय आरक्षण करायला शिकले, अगदी निवृत्तीला आलेले बँक कर्मचारी देखिल संगणकिकरणाला विरोध न करता संगणक वापरायला शिकले आणि म्हणूनच टिकले. अन्यथा त्यांनाही जावे लागले असते.
उगाच भावनेच्या आहारी न जाता वास्तविक विचार करा. जे मराठी काळाबरोबर बदलले ते आज मुंबईत आहेत इतकेच नव्हेत तर जगाच्या पाठीवर जाउनही मुंबईतले घर टिकवून आहेत. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, खा. मोहन रावळे हा गिरणी कामगाराचा मुलगा आहे.