सांजा मराठी पदार्थ आहे तर उपमा उडपी पदार्थ आहे.

सांज्यात हळद, बटाट्याच्या काचऱ्या (१/४ आकाराच्या चकत्या) वापरून जेवढ्यास तेवढे (१ वाटी रवा- १ वाटी पाणी) वापरतात. फोडणीत मोहरी, कढीलिंबांची पाने, हिरवी मिरची, वापरतात. सांजा अगदी मोकळा शिजवून घेतात. शिजल्यावर बशीत काढून त्यावर सुक्या खोबऱ्याचा कीस आणि कोथिंबीर पसरवून खायला देतात.

उपम्यात हळद, बटाट्याच्या काचऱ्या घालत नाहीत. पाणी १॥ पट ते दुप्पट वापरतात. शिजताना गाजर, फरसबी, मटार, कोथिंबीर घालतात. फोडणीत, मोहरी, कढीलिंबांची पाने, हिरव्या मिरच्या ह्या व्यतिरिक्त, उडदाची डाळ वापरतात. भिजवलेली चण्याची डाळ, काजूचे तुकडे, साजूक तूप ह्याच्या वापर करून उपमा मोकळा (पण सांज्याइतका नाही) आणि तुपकट बनवितात. 

सांजा आणि उपमा दोन्हीत पाणी आधणाचेच वापरावे.