छान... करून पाहायला हवी.
एक-दोन शंका.
अर्धा जुडी पालक आणि अर्धी जुडी कोथिंबीर घातलेली 'चटणी' ४-६ जणांना खूऽऽऽऽऽपच होईलसे वाटते. एवढी चटणी मला वाटते १५ ते २० जणांना पुरेल.
दुसरे, पालक जरा वाफवून घेतला तर? कच्या पालकाचा स्वाद बराच उग्र असतो. अर्थात, चटणीला उग्र स्वाद अपेक्षित असेल तर हरकत नाही. पण, मी पालक वाफवून घेईन म्हणतो.
दही हिरवा रंग कमी करेल (काही प्रमाणात), त्या ऐवजी लिंबू वापरले तर?
अर्थात हे माझे चोचले आहेत. प्रथम, मूळ पाककृती प्रमाणेच करून पाहीन.
धन्यवाद.