पुस्तकांची किंमत हाच एक निकष आहे. मी पण वाचनालयाचाच आधार घेते. बजाजनगर स्थित राजमाता जिजाबाई वाचनालयाची नागपुरात आल्यापासून म्हणजे जवळपास २० वर्षापासून मी  सदस्य आहे. २० वर्षापूर्वी मासिक शुल्क फक्त ३ रुपये होते ते आता १५ रु. झालं आहे जे सर्वसामान्यांना परवडणार आहे व पुस्तकसाठाही भरपूर आहे.  हल्ली मी भेट म्हणून मात्र पुस्तकच देते. ह्यावर्षी मी मुलांना वाढदिवस/मुंज प्रीत्यर्थ मुलांच्या मासिकाची वार्षिक वर्गणी भरली. त्यातली काही मुलं वाचतात ,काही नाही, काही चित्रात फक्त रंग भरतात तर काही  कोडी सोडवतात. पालकांची तक्रार असते की मुलं वाचत नाही म्हणून सेतू ह्या संस्थेतर्फे मागच्या वर्षी आम्ही मुलांसाठी 'पुस्तक मंदिर' सुरू केले. मुलांनी वाचनालयात बसून वाचायचे, आमचे स्वयंसेवक मुलांकडून वाचून घेतील फक्त पालकांनी आठवड्यातून एक दिवस मुलांना आणून सोडायचे पण आम्हाला प्रतिसाद मिळत नाहीये.  मागच्या महिन्यात द्वारकानाथजी नागपुरला आले होते तेव्हा त्यांनी आवर्जून वाचनालयाला भेट व देणगी दिली.