कुठलाही दुकानदार कुठलीही वस्तू तुम्हाला फुकट देत नाही असा विश्वास तात्यांच्याप्रमाणे माझाही आहे. पण बहुतेकांचा तो तसा नसतो. काहींना तर अशा फुकट मिळणाऱ्या वस्तू जमा करण्याची हौस असते. त्याबद्दलचा एक विनोद काही वर्षांपूर्वी वाचला होता. तो असा: 
एका बाईने अशा वस्तू जमा करून ठेवल्या होत्या आणि एका खोलीत व्यवस्थित मांडून ठेवल्या होत्या. येणाऱ्याजाणाऱ्याला ती सांगत असे की ह्या सर्व वस्तू मला साबणांवर फुकट मिळालेल्या आहेत.  शेजारची एक बंद खोली पाहून एका जास्त चौकस व्यक्तीने विचारले, 'ह्या खोलीत काय आहे?'  त्यावर ती बाई म्हणाली, 'त्या खोलीत ते सर्व साबण भरून ठेवले आहेत.'