वेदश्री,

थापताना गोळा ९० अंशातून थापला गेल्यावर ९० अंशातून घड्याळाचे काटे फिरतात त्या दिशेने फिरवून घेणे. ( म्हणजे साधारण तासकाट्याच्या १२ वाजताच्या स्थितीतून ९ वाजेच्या स्थितीपर्यंत हा गोळा थापायचा आणि मग अख्ख्या गोळ्याला ९ वाजेच्या स्थितीतून १२ वाजेच्या स्थितीपर्यंत नेण्यासाठी फिरवायचे ! ) याप्रमाणे थापत-फिरवत गेल्यास गोळा हळूहळू भाकरीचा आकार घेऊ लागतो.

मूळ पाककृतीतील पद्धत आणि आपण सुचविलेल्या पद्धतीत विशेष फरक नाही. मुळात ही कृती (भाकरी थापण्याची) सवयीने/सरावानेच साध्य होते. त्यामुळे एकदम ९० अंशावर न जाता हळूहळू सराव करत आणि आपल्याला जे जमते आहे तसे थापत जावे. निपुणता आल्यावर नव्वदच काय १८० कोनातही भाकरी थापायला हरकत नाही.

भाकरी ही लोखंडाच्या तव्यावर जास्त छान बनते. असा तवा वजनाने जड असल्याने भाकरी आचेवर टाकायच्या वेळेस तो सांडशीने उचलायचा झाल्यास खूप अवघड जाते. अशावेळेस सरळ आचेवर भाजणे शक्य नसल्यास ....

चुलीवर भाकरी करणाऱ्या बायका लोखंडी तवा लिलया पेलतात. गॅसवर करताना बाजूचा गॅस चालू ठेवून त्यावर भाकरी भाजता येतात. पण, भाकरी उघड्या आंचेवरच जास्त खरपुस भाजली जाते. कोळशाची शेगडी असेल तर विचारायलाच नको. पण तव्यावर फिरवून केलेली भाकरी फुगेल पण तेवढी चविष्ट होणार नाही.

( याकरता तुम्ही एका बाजूने एका हातातील तवा आणि दुसऱ्या बाजूने दुसऱ्या हातातील कलथा यांचा  वापर करू शकता ! आहे की नाही एकदम सोप्पं? :D )

आधी हाताला चटके तेंव्हा मिळते भाकर.

चुलीवरच्या भाकरीदा जव्वाब नहीं !

ह्यातच सर्व आले.

भाकरीच्या खमंगपणासाठी आणि ती थापताना, उचलताना मोडू नये म्हणून ज्वारी दळून आणताना १ किलो ज्वारीला १ वाटी आख्खे उडीद किंवा उडदाची डाळ मिसळून दळून आणावे.

ज्वारीचे पीठ जास्त जुने असल्यास भाकरी थापणे/उचलणे कठीण जाते. ती मोडते. उद्या भाकरी करायच्या असतील तर आज ज्वारी/उडीद दळून आणावे.

जुन्या पीठाच्या भाकरी मोडतात म्हणून त्यात थोडे गव्हाचे पीठ मिसळावे. पण त्याने भाकरीचा खमंगपणा कमी होतो.

बाजारच्या तयार पीठात, भाकरी व्यवस्थित व्हाव्यात म्हणून, (आणि तयार पीठासाठी ग्राहकाने पुन्हा पुन्हा आपल्याकडेच यावे म्हणून) गव्हाचे पीठ मिसळलेले असते. त्यामुळे तयार पीठ घेणे टाळावे.