गाणे इथे लिहून दिल्याबद्दल धन्यवाद, मिलिंद.
मस्तच ! गदिमा खरंच जादूगार आहेत.. काय भन्नाट सुंदर लिरिक्स आहे त्यांनी लिहिलेल्या गाण्यांचं.
हे गाणे आशा भोसलेंनी म्हटलेले आहे, हे माहिती नव्हते कारण आजतागायत मी हे गाणे त्यांच्या आवाजात कधीच ऐकलेले नाही ! स्वयंपाक करताना माझी आई, तिचा मूड लागेल तशी तिच्या आठवणीतली अनेकानेक गाणी म्हणत असते, त्यातच हे गाणंदेखील म्हणताना मी तिला कैकदा ऐकले आहे. तिच्या तोंडून गाणी ऐकण्यातली गोडीच ती काही और आहे. हे गाणे तिच्या तोंडून ऐकता ऐकता तल्लीन होऊन जायला होतं आणि जणू काही मीच शबरी आहे आणि रामाला माझ्या आश्रमात येण्याचे आर्जव करते आहे असे वाटण्या इतपत गाण्यात एकरूप होऊन जायला होते. आईचा मूड लागून ती गाणी गाते तेव्हाच अशी जादू होते.. ठरवून गायला सांगितल्यावर ही जादू तितकी प्रभावी वाटत नाही हीच काय ती माझी तक्रार असते तिच्याकडे. :-(