आपल्या पुस्तकांत शिवाजी महाराजांचा "वाट चुकलेला लुटारू" म्हणून उल्लेख करणारे व मराठी लोकांना भाषिक राज्य देण्याबाबत व गोव्याचे महाराष्ट्रांत विलीनीकरण करण्याच्या बाबतींत आत्यंतिक आकसाने वागणारे पंडित नेहरू हे काश्मिरी ब्राह्मण होते हे सर्वांना ठाऊक आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ऐन भरांत असतांना याच नेहरूंबद्दल त्यावेळचे महाराष्ट्राचे राज्यकर्ते "महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे" असे जाहीर सभांतून सांगत असत. तात्पर्य, मराठी ब्राह्मणांचा द्वेष करणाऱ्या मराठी राज्यकर्त्यांना नेहरू या महाराष्ट्रद्वेष्ट्या अ-मराठी ब्राह्मणाबद्दल मात्र भयंकर आदर होता.