वाईट अर्थ चिकटलेला आणखी एक शब्द म्हणजे "भंगी". खरे तर भंगी म्हणजे भंगकाम करणारा, तोडफोड करणारा. टाकाऊ वस्तू मोठ्या आकाराची असेल तर तिची विल्हेवाट लावणे कठीण जाते. अशा वेळी तिचे लहान लहान तुकडे करणे एकूण कचरा हाताळण्याच्या दृष्टीने सोयीस्कर असते. हे भंग करण्याचे काम करून कचरा हाताळणारा तो भंगी.