या ब्राम्हणांमधील सर्वात जास्त तिरस्करणीय उपजमात म्हणजे, कोकणस्थ. हा समाजच आता पारश्यांसारखा नष्ट होण्याच्या मार्गाने चालला आहे.याबद्दल खात्रीलायक आकडेवारी उपलब्ध आहे का ? पारशी समाज नष्ट होण्यामागे, लग्नाची जबाबदारी नको असणे, मूल नको असणे, उच्च जीवनमान अनुभवता यावे यासाठी लग्न नको असणे इ. अनेक कारणे असल्याचे एका वृत्तपत्र-वाहिनीवर पाहिले होते. त्या कार्यक्रमात पारशी समाजातर्फे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीने, 'भारतातील' पारशी समाज नष्ट होत असल्याचे आणखी एक कारण म्हणजे बरीच पारशी कुटुंबे स्थलांतर करत असल्याचे म्हटले होते. अजूनतरी लग्न/मूल नको असणे इ. गोष्टी को. ब्राह्मणांमधे लक्षणीयरीत्या वाढलेल्या आहेत असे वाटत नाही. त्यामुळे नष्ट होणे म्हणजेच थोडक्यात आपल्याला को. ब्राह्मणांचे स्थलांतर असे म्हणायचे आहे का?
त्यांच्या नाहीसे होण्याने, समाजाची थोडीशी का होईना हानी होणार आहे, याची काहीही खंत / जाणीवही दिसत नाही.
को. ब्राह्मणांव्यतिरिक्त लोकांच्या दृष्टीने नक्की काय हानी होणार आहे हे समजले नाही.