आपले म्हणणे १००% सत्य आहे. आपल्या मराठी भाषेचे हे एक विशेष आहे. आणि मराठी माणसांचेपण.
माझ्या एका नातेवाईक मुलीने मला एक प्रश्न विचारला होता, 'आपल्या मराठीत, "जिजाजी" या सुंदर शब्दाला तितकाच सुंदर समानार्थी शब्द काय आहे ' अर्थात माझे उत्तर 'माहीत नाही' असे होते. पण 'जिजा'जी या शब्दात असणारा जो मित्रत्वाचा आणि थोडासा आदराचा भाव आहे (समवयस्काला- 'जिजा' आणि मोठ्यांना- 'जिजाजी') तो आपल्या मराठीतला शब्द दाखवील का?
पण असे अनेक शब्द (परभाषीय) आज आपण वापरतो कि जे आडोसा म्हणून वापरले जातात (उदा. साला - मेव्हणा)
आता माझे मत :
बाथरूमला जातो म्हणण्यापेक्षा 'स्नान करून येतो' म्हणणे जास्त योग्य.
फ्रेश होऊन येतो, १/२ नंबरला जाऊन येतो म्हणण्यापेक्षा 'टॉयलेटला जाऊन येतो" हे म्हणणे योग्य.
रोमान्स म्हणण्यापेक्षा 'प्रेम करणे' हे म्हणणे योग्य.
माय लव्ह म्हणण्यापेक्षा 'माझी विशेष मैत्रीण' म्हणणे जास्त योग्य.
प्रसाद.
प्रसाद.