खरं आहे अंजू,

ह्या सगळ्या प्रकारचे नेमके वर्णन तू केले आहेस. छान लेख. आवडला.

आजकाल ह्या फुकटच्या नादात आपण गरजेच्यापेक्षा किती वायफळ खर्च करतो ते खरेदी करून घरी आल्यावरच समजते. आणी भारतापेक्षा इंग्लंड मध्ये तर ह्या डील्सचा सुळसुळाट झालेला दिसतो. अर्थात आपल्या देशात ही काही प्रमाणात हे सुरु झालेच आहे म्हणा!

सामान्य ग्राहकाला गोंधळवुन टाकून स्वत:चा फायदा करून घ्येण्याचा हा एक हुशार मार्ग व्यापाऱ्यांनी शोधला आहे. आणि त्यांच्या ह्या क्लुप्तीला आपण जाणून बुजून बळी पडतो.

काय करणार खरेदीची हौस थोडी आखडती घ्यायची आणी जागरुकपणे ग्राहकाची भूमिका करायची. दुसरे आपण काय करू शकतो म्हणा.