वर अनेकांनी म्हटल्या प्रमाणे ते पुस्तक विकत घेतल्यावर मी किती वेळा वाचीन, हे पाहूनच मी ते घेतो. अर्थातच आधी मित्राकडून, वाचनालयातून आणून वाचून मगच निर्णय घेतो. किंमत ही फार मोठी अडचणीची बाब आहे हे नक्कीच. त्यामुळे अनेक पुस्तके आजही घ्यायची राहून गेली आहेत.
या प्रसंगी मला माझ्या 'कोसला' च्या खरेदीची राहूनराहून आठवण येते. मी कोसला आधी वाचले ते तेंव्हा आवडले. मग वडीलांबरोबर 'रसीक साहित्यच्या' प्रदर्शनात स.प. मध्ये गेलो असताना ते घ्यायचा मी आग्रह केला. वडीलांना ते फारसे पसंत नव्हते. पण माझी अभिरुची अतिशय उच्च आहे, माझ्या साहित्यविषयक कल्पना सगळ्यांना कशा समजणार वगैरे भ्रमात मी असल्याने हट्टाने ते पुस्तक १५० रू देऊन घेतले. हाय राम! आणि एक दोन महिन्यातच मला त्यातल्या भावनीक वातावरणाचा, त्या शैलीचा असा उबग आला, की आता तर मला कोसला म्हंटले की ते १५०रू आठवतात. आता वाटते की ' साऱ्या जगातल्या करूणेने बुद्धाच्या पापण्यांचे पंख लाऊन हळूहळू तरंगत खाली यावे आणि ती प्रत घेऊन जाऊन माझे १५०रु परत द्यावेत. ' हा हा :)
--लिखाळ.